मनसेच्या मोर्चाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

0
 

करवाढ रद्द करण्याचे संबंधित विभागाला आदेश : दिलीप धोत्रे 

        पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर नगर परिषदेने मालमत्ता करात मोठी वाढ केल्याने सोमवारी मनसे व विठ्ठल परिवाराच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेवर मोर्चा  काढण्यात आला होता. यानंतर सोमवारी रातोरात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नागपूर येथे जाऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करवाढीच्या माध्यमातून पंढरपुरातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती दिली. 

           यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला करवाढ तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.

           पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करावर मोठी वाढ केल्याने पंढरपुरातील नागरिकांनी पालिकेला लेखी तक्रारी दिल्या आहेत. तर विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन  विरोध केला आहे.

        मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पंढरपुरातील नागरिकांवर जुलमी कर वाढच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला आणि करवाढ रद्द करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.

        यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर देण्यात आलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करून संबंधित विभागाला करवाढ रद्द करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.

या आदेशामुळे आता पंढरपूरकरांवर लादण्यात आलेल्या जुलमीकरवाढबाबत दिलीपबापू धोत्रे यांच्या प्रयत्नामुळे करवाढ रद्द करण्याचा निर्णय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)