दादागिरी थांबवा..अन्यथा जशास तसे उत्तर देवू; ओबीसी बांधव आक्रमक

0
भाळवणी येथे विविध घटनेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन

           भाळवणी  ता. पंढरपूर (प्रतिनिधी) -  आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. विरोध आहे तो त्यांच्या झुंडशाहीला व दादागिरीला. ओबीसी समाजाला घटनेने व मंडल आयोगाने दिलेले आरक्षण अबाधित राहिले पाहिजे यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने ओबीसी महाएल्गार सभा आयोजित केल्या जात आहेत. परंतु काही समाजकंटकाकडून ना. छगनराव भुजबळ यांच्यावरती एकरी भाषेत होत असलेल्या वक्तव्याबाबत तसेच गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावरती इंदापूर येथे करण्यात आलेल्या चप्पल फेक प्रकरणी निषेध व्यक्त करत प्रशासनाने आमचा अंत पाहू नये. वादविवाद होऊ न देता अशा समाजकंटकांना तात्काळ आळा घालावा व अशी दादागिरी थांबवा... अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, अशी आक्रमक भूमिका रस्ता रोकोप्रसंगी ओबीसी समाज बांधवांनी मांडली.
      भाळवणी (ता : पंढरपूर) येथे पंढरपूर - सातारा महामार्गावर महा. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत होत असलेले वक्तव्य व आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या चप्पल फेक प्रकरण निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विजय शिंदे, संजय मासाळ, लुकमान इनामदार, संतोष मासाळ, अमोल लिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. या रस्ता रोकोप्रसंगी ओबीसी नेत्यावरती होणारे हल्ले व एकेरी भाषेत बोलणाऱ्या समाजकंटकांना वेळीच थांबावावे तसेच जातनिहाय जनगणना तात्काळ सुरू करा, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र वाटप तात्काळ थांबवावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन ओबीसी समाज बांधवांच्या वतीने अप्पर तहसीलदार तुषार शिंदे व पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे यांनी केले.
       यावेळी दीपक गवळी, विजय शिंदे, दिलीप भानवसे, प्रवीण शिंदे, अमोल लिंगे, लुकमान इनामदार, गोरख लिंगे, दिगंबर कारंडे, अर्जुन लिंगे, सचिन म्हेत्रे, दिलीप वाघमारे, शुक्राचार्य गवळी, नागनाथ खरात, धोंडीराम शिंदे, सद्दाम सय्यद, मुसा शेख, किशोर खरडकर, अभिमान गोफणे, पोपट इंगोले, निलेश गवळी, संजय मासाळ, तानाजी केसकर, माऊली केसकर, रामचंद्र केसकर, राजमोहम्मद मुजावर, आबासो शेंडगे, नागनाथ सातपुते, अनिल माने, अंकुश गायकवाड, अमोल वाघमारे, संजय लिंगे, प्रशांत माळवदे, मनोज खांडेकर, दत्तात्रय वाघमोडे, अनिल सातपुते, संजय मोहिते,  भारत देशमुख, राजकुमार मासाळ, बिरुदेव मासाळ, लहू केसकर, जयसिंग मदने, मधुकर मासाळ, श्रावण शेंडगे, संतोष मासाळ आदी भाळवणी गटातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्ता रोको प्रसंगी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)