समूह गायनामध्ये पटकावला प्रथम क्रमांक
पंढरपूर (प्रतिनिधी) शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या पंढरपूर तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक,शाळा देगाव ता.पंढरपूर येथील विद्यार्थिनींनी समूह गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.या स्पर्धेसाठी संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील अनेक जि.प. शाळांनी सहभाग घेतला होता.
यावेळी देगाव जि प शाळेतील मुलींनी आपल्या सुमधुर मंजुळ स्वरांनी उपस्थित परीक्षक व श्रोत्यांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळवला.तसेच त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशामध्ये देगाव जि.प शाळेचे मुख्याध्यापक श्री बुधवंतराव सर,सौ.कुलकर्णी मॅडम,श्री पाटोळे सर,श्री बंगाळे सर,श्री भोई सर,सौ. गुरसाळकर मॅडम,सौ.वाघमारे मॅडम,सौ.खुणे मॅडम,श्री शिंदे सर आदींचे सहकार्य लाभले आहे.