ह.भ.प भागवताचार्य प्र. द.निकते सरांचे अल्पशा आजाराने निधन

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - साप्ताहिक पंढरी संदेशचे सिद्धहस्त लेखक
ह.भ.प भागवताचार्य प्र. द.निकते सर यांचे अल्पशा आजाराने आज दि.7/12/23 रोजी दुःखद निधन झाले. यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ७ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

  ह.भ.प भागवताचार्य प्र.द.निकते सरांनी वारकरी संप्रदायाची सेवा अखंड जीवनभर केली. श्री संत नामदेव महाराज गाथ्याची त्यांनी शेकडो पारायणे  केली. आपल्या सेवा मंडळाचे वतीने
श्रीसंत नामदेव महाराजांचे तत्त्वज्ञानाचा महाराष्ट्र  महाराष्ट्र बाहेर प्रसार प्रचार केला. अनेक तरुणांना त्यांनी संप्रदायाकडे वळविले.

वारकरी संप्रदायाची अखंड केलेल्या सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकताच त्यांना गाथावृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. साप्ताहिक पंढरी संदेश च्या कार्यात सुरुवातीपासून सरांचा मोठा सहभाग होता.

            त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सूना, लेकी, बंधू-भगिनी,  जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सा. पंढरी संदेश परिवाराचे वतीने निकते सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)