भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिवपदी नितीन काळे

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील सामाजिक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्णवेळ सक्रीय असलेले व अनेकांच्या अडचणींना मदतीला धावून जाणारे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदांवर काम केलेले आहे. असे पंढरपूर येथील युवा नेते नितीन काळे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली असून त्यांची निवड भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केलेली असून निवडीचे पत्र आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते पंढरपूर येथे देण्यात आले.
        या निवडीनंतर नितीन काळे यांनी पक्षाचे आभार मानून सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यस्तरावर काम करण्याची संधी दिली त्या संधीचे नक्कीच सोने करेन असा विश्वास व्यक्त केला.
         या निवडीबद्दल त्यांचे वरिष्ठ स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंढरपूर -मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सर, मा. नगरसेवक डि.राज सर्वगोड, भाजप नेते माऊली हळणवर व युवा कार्यकर्त्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)