स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला विकसित भारत संकल्प कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ

0
अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये केले होते थेट प्रक्षेपणाचे आयोजन
           पंढरपूर (प्रतिनिधी) - आज सोमवार (दि.११ डिसेंबर, २०२३) रोजी सकाळी १०:३० ते ११:०० च्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत संकल्प’ या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ स्वेरीतील विद्यार्थ्यांनी घेतला. या थेट प्रक्षेपणाचे आज भारतभर आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने स्वेरीतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार वर्गात बसून तन्मयतेने ऐकले व या उपक्रमाचे स्वागत केले. 
           स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये एल.सी.डी. प्रोजेक्टर द्वारे विकसित भारत संकल्प या  कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले गेले होते. प्रारंभी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सामुहिक उदघोषणेद्वारे सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. प्रत्येक वर्गात आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल मध्ये थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय केलेली होती. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'भारत जलद गतीने विकसित होण्यासाठी ‘विकसित भारत @ २०४७’ या अभियानचे आयोजन केले असून यात प्रत्येक भारतीय युवकांना नेतृत्व करण्यासाठी प्रोत्साहित केले. या अभियानामध्ये विकसित भारताचे ध्येय, त्यासाठी युवकांची मदत, नागरिकांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांच्या संकल्पना, सूचना, विविध राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे तयार करण्यासाठी देशातील तरुणांचा सक्रियपणे सहभाग आवश्यक असल्याचे व तरुणांनी कौशल्य विकास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केली. सर्वोकृष्ट संकल्पनांना पुरस्कार देण्याची घोषणा देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली. जलद गतीने भारत विकसित  करण्यासाठी ठरवलेले ध्येय त्यांनी स्पष्ट केले. या ध्येयाच्या अनुषंगाने, देशातील तरुणांना 'विकसीत भारत’ संबंधित कार्यात नवविचारांचे योगदान देण्यासाठी या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
          भारत विकसित होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अर्धा तासाच्या कालावधीत अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडले. स्वेरी अभियांत्रिकीच्या व फार्मसीच्या प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला व  महत्वाचे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत नोंद करून घेतले. या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाला स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, वर्गशिक्षक, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)