पंढरपूर (प्रतिनिधी) दि.18 - उजनी धरणातून सध्या होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळून रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन मिळणेसाठी आपणाकडून पुढील पाण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्रविकास प्राधिकरण,सोलापूर श्री साळे साहेब यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
सोलापूर जिल्हयात यावर्षी पाऊसकाळ कमी पडल्याने उजनी धरणात आज रोजी 20 % पाणी शिल्लक आहे. रब्बी हंगाम 2023 करीता सोडण्यात आलेले आवर्तन बोगदा कालवा व इतर स्त्रेातामधून चालु असल्याचे दिसत आहे. कालवा सल्लागार बैठकीमध्ये रब्बी करीता दोन आवर्तने देण्याचे नियोजन झालेले आहे. सध्यस्थितीत धरणात पाणी कमी असताना पाण्याचा अपव्यय होत असून रब्बीचे दुसरे आवर्तन मिळणेबाबत अडचणीचे होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे दुसरे आवर्तनाकरीता लागणारे पाणी उजनी धरणामध्ये शिल्लक ठेवून रब्बीचे दुसरे आवर्तन देणेबाबत नियोजन होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हयातील बहुतांष शेतकऱ्यांचा उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यावर अवलंबुन असलेल्या शेतकऱ्यांचा चाऱ्याचा तसेच गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तरी उजनी धरणातून सध्या होत असलेला अपव्यय टाळून रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन मिळणेसाठी आपणाकडून पुढील पाण्याचे नियोजन करण्यात यावे असे निवेदनात काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक,अरुण नलवडे, अमोल माने, शंकर कवडे, अर्जुन जाधव, पांडूरंग नाईकनवरे, नारायण शिंदे, अनिल नागटिळक,समाधान उपासे, विष्णु सुरवसे, हरिभाऊ मुजमुले, विकास पवार, पिनु जाधव, निलेश काळे, योगेश काळे, सत्यवान नाईकनवरे, महादेव नरसाळे, अक्षय पवार, सचिन पवार, योगेश जाधव, विश्वास उपासे, सुनिल पाटील, शरद यलमार,सतीश नागाने इत्यादी मान्यवर होते.