महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी रामचंद्र सरवदे
पंढरपूर (प्रतिनिधी) -
पंढरपूर येथील साप्ताहिक ठिणगीचे संपादक, जेष्ठ पत्रकार श्री. रामचंद्र सरवदे यांची नुकतीच पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पंढरपूर येथे करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे, पंढरपूर शहराध्यक्ष दत्ता पाटील, प्रसिद्ध प्रमुख रामकृष्ण बिडकर, विनोद पोतदार आदि पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी रामचंद्र सरवदे म्हणाले- पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी माझ्यावर कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ती मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने निश्चितपणे पार पाडेन. तसेच पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन. संघटना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यानंतर आभार प्रदर्शन पत्रकार विनोद पोतदार यांनी केले.