शु. य. मा. ब्र. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत बरसावडे यांचे निधन

0
 
 
       पंढरपूर (प्रतिनिधी) -येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रम्हवृंद संस्थेचे उपाध्यक्ष  श्रीकांत बरसावडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज रोजी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी ते 67 वर्षांचे होते.
       त्यांची अंत्ययात्रा दुपारी तीन वाजता नागालँड पाठीमागील त्यांच्या घरापासून निघणार आहे.
        श्रीकांत बनसोडे हे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रम्हवृंद संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत. व्यवसायाने इंजिनियर असल्यामुळे संस्थेच्या झालेल्या बांधकामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.. संस्थेत होणाऱ्या श्रीज्ञानेश्वरी पारायण, श्रीतुकाराम गाथा पारायण या पारायनातही ते हिरीरीने सहभागी होत. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ पसरली आहे.
          त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. साप्ताहिक पंढरी संदेश परिवार बारसावडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
       

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)