पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक दत्तात्रेय धारूरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक अनिल अभंगराव, ज्येष्ठ शिक्षक बी एच गुलाखे, कु विजया टेके, एन पी डांगे आदी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या जिवनकार्याबदद्ल विद्यार्थी व शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली