पंढरपूर (प्रतिनिधी) - मागील आठवड्यात भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रजी कुकरेजा यांनी नागपूर येथे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी पंढरपूर येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रशांतजी सापनेकर यांची भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली.
प्रशांत सापनेकर हे पूर्वश्रेमीचे संघाचे स्वयंसेवक असून त्यांनी भाजपा शहर संघटन सरचिटणीस भाजपा पंचायतराज विकास जिल्हा सहसंयोजक या पदांवर यापूर्वी काम केलेले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.