जिल्हा सरकारी वकील रजपूत आता सीबीआयचे विशेष सरकारी वकील
December 19, 2023
0
सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूरचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीने त्यांची कार्यकक्षा वाढली असून आता ते देशातील विविध महत्वाच्या खटल्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार.
90 जणांना जन्मठेप आणि दोघांना फासापर्यत पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणारे सोलापूरचे जिल्हा प्रमुख सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांची सीबीआयचे सोलापूर जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे त्यांना सोमवारी भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडून नियुक्ती पत्र प्राप्त झाले. सोलापूर जिल्हा न्यायालयात त्यांनी केलेली विशेष आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारकडून घेण्यात आली. 1996 पासून त्यांनी वकील म्हणून सेवा देण्यास सुरू केली. अडीच वर्ष सहाय्यक सरकारी वकील तर गेल्या साडेपाच वर्षापासून ते प्रमुख जिल्हा सरकारी वकील कार्यरत आहेत. त्यांच्या या कारर्किदीत अनेक मोठे खटले अवघ्या काही दिवसात चालवून कमी वेळेत अनेकांना शिक्षे पर्यत पोहोचवले आहेत. त्यांनी केलेला रेकॉर्ड हा विशेष उल्लेखनीय आहे. यापुर्वी ते दयानंद महाविदयालयात 16 वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच 7 वर्ष पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच जनता सहकारी बँकेचे ते संचालक म्हणूनही काम करतात त्यांच्या या कर्तुत्ववान कामगिरीबद्दल सोलापूर महानगर पालिकेने त्यांना मानपत्र देवून सन्मानित केले आहे.
सध्या महाराष्ट्राची सेवा करतो आता देशाची सेवा करण्याची संधी मिळाली - अॅड रजपूत
गेल्या अनेक वर्षापासून वकीली करत असताना अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. तब्बल 90 जणांना जन्मठेप तर 2 जणांना फाशीची शिक्षा देण्यापर्यत खटला चालवला आहे. त्याचीच दखल घेवून सीबीआयच्या विशेष सरकारी वकील पदावर माझी नियुक्ती झाली आहे त्याचा आनंद आहे. चांगली संधी मिळाली त्याचे सोने करणार आणि मोठे मोठे खटले चालवण्याची संधी मिळेल त्यातून चांगले काम करणार अशी प्रतिक्रिया प्रमुख जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे नवनियुक्त विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी व्यक्त केली.
Tags