पंढरपूर (प्रतिनिधी) - फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रेप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडिया (एएफएमआरएआय) च्या आवाहनानुसार नुसार देशातील औषध विक्री क्षेत्रात काम करणारे दोन लाखांवर विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) बुधवार दिनांक 20 डिसेंबर रोजी एक दिवसाच्या लक्षणीय संप आंदोलन करून आपले विविध मागण्यांचे निवेदन पंढरपूर तहसीलदार साहेब यांना देण्यात आले,
वैद्यकीय प्रतिनिधींच्या नोकरीला कायदेशीर संरक्षण मिळवून देणारा विक्री संवर्धन कर्मचारी कायदा 1976 (एसपीइ ऍक्ट 1976) केंद्राने सप्टेंबर 2020 च्या संसद अधिवेशनात नवीन कामगार कायदे मंजूर करताना मोडीत काढला त्यामुळे मालकाला कामगार कर्मचाऱ्यांचे शोषण करण्याचा मुक्त परवाना मिळाला . वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाचे नियमन कायद्याने ठरवलेले नसल्यामुळे कंपन्या स्वतःच्या खाजगी कामाचे नियम बनवून शोषण करीत आहेत.
सरकारी आरोग्य व्यवस्थापनात वैद्यकीय प्रतिनिधींना औषधी प्रमोशनसाठी केंद्राने बंदी घालून राज्यघटनेने दिलेल्या रोजगाराच्या अधिकारावर गदा आणली आहे.
केंद्राकडे औषधाच्या किमतीचे नियमन करण्याची यंत्रणा असूनही सरकार औषध कंपन्यांच्या दबावाखाली अंमलबजावणी करीत नाही. औषध व औषधी उपकरणांसह अन्य उपकरणावरील जीएसटी रद्द करून जनतेला दिलासा द्यावा.
या काही प्रमुख मागण्या होत्या.
सदर प्रसंगी पंढरपूर सब युनिट सेक्रेटरी युवराज सरडे, मानसिंग खंदारे, प्रसाद तरकसबन, अभिजीत कोळी, धनंजय थिटे, सागर शिंदे, ताहीर मेजरागुप्पि, कुमार कांबळे, गणेश वेळापुरे, सुधीर खुर्द, प्रवीण कोळी, वैभव पोतदार विशाल कांबळे , प्रवीण गुजरे, सचिन इनामदार, स्वप्निल इनामदार,, सागर धर्माधिकारी, विशाल देशमुख, राहुल कोळी, राजू महाजन, ऋषिकेश माळी, आशिष सरवदे, भास्कर खरात, संदीप साळुंखे, रामचंद्र वेळापुरे, सचिन गायकवाड इत्यादी संघटनेचे सदस्य उपस्थित होते