निवडी प्रसंगी उपसरपंच गुरुदत्त गोसावी म्हणाले की, श्रीलक्ष्मीनरसिंह आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे व नरसिंगपूर ग्रामस्थांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी उपसरपंच झालो आहे याचा मला आनंद आहे. गावाच्या सर्व प्रमुखांना व सदस्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच गावाचा विकास पुढे जोमाने करीन गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्न करेन. माजी उपसरपंच सौ. रेणुका काकडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी गुरुदत्त गोसावी यांची बिनविरोध निवड केली.
सदर निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक महेश संभाजी म्हेत्रे यांनी पाहिले. याप्रसंगी विद्यमान सरपंच सौ. अर्चना सरवदे, माजी सरपंच सौ. अश्विनी सरवदे, माजी उपसरपंच रेणुका काकडे, माजी उपसरपंच विठ्ठलराव देशमुख, माजी उपसरपंच सुनील मोहिते, ग्रामपंचायत सदस्य जयश्री राऊत, ग्रामपंचायत सदस्य उमेश कोळी, तसेच कर्मचारी उमाकांत केसकर व सुरवसे यांच्या उपस्थितीत निवड पार पडली.
निवडी नंतर ग्रामस्थांच्या वतीने नूतन उपसरपंच गुरुदत्त गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.