वसंतराव काळे प्रशालेतील राष्ट्रीय खो -खो स्पर्धेत भारत देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या व डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडूचा सत्कार समारंभ संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा .श्री. कल्याणरावजी काळे साहेब यांच्या शुभहस्ते वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथील कल्याणराव काळे क्रीडा मंडळाच्या अष्टपैलू खेळाडू समृद्धी सुरवसे स्नेहा लामकाने कल्याणी लामकाने यांनी कर्नाटक टिपतुर येथे 13 ते 17डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून भारत देशात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी राज्यस्तरीय खोखो स्पर्धेत सहभागी झालेल्या यशस्वी खो-खो खेळाडू व उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत प्रशालेतील 17 वर्षाखालील मुलांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संघातील सर्व खेळाडूं ,वाराणसी येथे झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्त खेळाडू प्रांजली काळे, अश्विनी जगदाळे , डॉजबॉलचे मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री. संतोष पाटील सर प्रशिक्षक फिरोज पठाण खो- खो चे प्रशिक्षक श्री. अतुल जाधव सर श्री समाधान काळे सर याचा ही सत्कार यावेळी करण्यात आला .
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव मा. श्री. बाळासाहेब काळे गुरुजी, रामचंद्र लामकाने वाडीकुरोली येथील प्रगतशील बागायतदार श्री. बाळासाहेब पाटील श्री. सुरेश काळे डॉ. श्री. अजित काळे श्री. निलेश काळे खेळाडूंचे पालक अनिल लामकाने, सुनील लामकाने, पांडुरंग सुरवसे, संजय काळे, नवनाथ काळे, प्रशालेचे प्राचार्य श्री. दादासाहेब खरात सर श्रीमंतराव काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल कौलगे सर पर्यवेक्षक श्री. सत्यवान काळे सर सर्व शिक्षक बंधू- भगिनी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.