पंढरपूर (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी युवा गर्जना संघटनेचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे निवड झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई येथे पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते काळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. काळे यांच्या निवडीने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तरुण आश्वासक चेहरा पक्ष संघटनेसाठी मिळाला आहे. युवा गर्जना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवले आहेत. युवा गर्जना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तरुणाईचे चांगले संघटन कडे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बळ मिळणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सहकारशिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी समाधान काळे यांचे अभिनंदन केले.