पंढरपूर :- (दि.02)- श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांसह स्थानिक नागरिक, पर्यटक यमाई तलाव परिसर येथील तुळशी वृंदावन उद्यान पाहण्यासाठी येतात. तुळशी वृंदावन उद्यान देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यासाठी बंद ठेवण्यात आले होते.
तुळशी वृंदावन उद्यानातील कामे पुर्ण झाल्याने दि.8 जानेवारी 2024 पासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी दिली आहे.