1996 ला कृषी विभागात वाहन चालकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पुणे, करमाळा, सांगोला, मंगळवेढा आदी ठिकाणी वाहन चालक म्हणून उत्तम प्रकारे सेवा बजावत आपले काम उत्तमरीत्या चालवत सेवा बजावली. गेली अठ्ठावीस वर्षे झाले वाहन चालक म्हणून कृषी कार्यालयात चालक पदावर असून सध्या पंढरपूर तालुका कृषी कार्यालयात चालक पदावर काम करत आहेत. गेली अठ्ठावीस वर्ष उत्तमरीत्या वाहन चालक म्हणून काम केल्याबद्दल त्या कामाची दखल प्रशासनाने शासनाने घेऊन त्यांचे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या उत्कृष्ट सेवेच्या कामगिरीबद्दल दखल घेऊन त्यांचा उत्कृष्ट वाहन चालक म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.
सन २००९ पासून सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था पंढरपूर येथे त्यांनी संचालक तसेच व्हाईस चेअरमन, चेअरमन, सचिव म्हणून उत्तमरीत्या कामगिरी पार पाडली. हे करत असताना त्यांनी सण 2022/2023 मध्ये या संस्थेच्या इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष म्हणूनही कामकाजाची जबाबदारी घेऊन पंढरपूर येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांची पतसंस्थेची इमारतही पूर्ण करून जबाबदारी पार पाडली. हुसेन तांबोळी हे गेली अनेक वर्षापासून पंढरपूर नजीक असलेल्या लक्ष्मी टाकळी येथे राहत असून त्यांनी मुस्लिम समाजाकरता लोकवर्गणीतून आरसीसी इमारत समाज बांधवांसाठी पूर्ण केली. हे सर्व करत असताना त्यांनी आपली वाहन चालक पदाची जबाबदारीची कामगिरीही तेवढ्याच चोखपणे पार पाडली. इतर सामाजिक कार्यातही आपले कर्तव्य पूर्णपणे बजावून सहभाग घेतात. या सर्व कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची उत्कृष्ट वाहन चालकपदी निवड करून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आले. हे सर्व करत असताना त्यांनी कौटुंबिक जबाबदारी तेवढ्याच निष्ठेने पार पाडली असून एक मुलगी डी फार्मसी, दुसरी मुलगी बी ए एम एस शिक्षण घेत आहे. सर्व करत असताना वाहन चालकाची जबाबदारी तेवढ्याच काळजीपूर्वक पार पाडून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव असल्याने ते समाजकार्यात तेवढ्याच जोमाने भाग घेताना दिसतात.
अशा या कृषी विभागात वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या हुसेन तांबोळी या वाहन चालकाची दखल घेऊन यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.