शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशालेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब पंढरपूर यांची अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा पंढरपूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
           सदरच्या कार्यक्रमासाठी युवराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री उमेश ललिता ज्योतीराम सासवडकर सचिव दत्तात्रय देवमारे व सदस्य ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सदरच्या कार्यक्रमांमध्ये अंधशाळेतील मुलांनी छानस गीत म्हणून तसेच अगदी ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत केलं.
 .         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंधशाळेचे मुख्याध्यापक संतोष बाराते यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमाजी सासवडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या मनोगतामध्ये आमच्या युवराज नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत आपणास आवश्यक ती मदत लाभेल; ती आर्थिक सामाजिक स्वरूपाची भरीव आशी मदत करण्याची ग्वाही दिली.
      तसेच आज जयंती निमित्त सत्यशोधक युवा प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत आधार नाव नोंदणी व मतदान नाव नोंदणी मध्ये आमच्या आदेशातील दोन विद्यार्थ्याचे आधार नंबर काढून घेतले त्याबद्दल आमचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मुन्नागीर गोसावी यांनी त्यांच्या आभार मानले. उपस्थित पाहुण्यांचा मुलांच्या हस्ते  पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेशजी सासवडकर यांनी आज मुलांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खाऊवाटप केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)