कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केली आशा सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळाले पाहिजे,जे शेतकरी माजी सैनिक आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे.
या आंदोलनाला आज मनसेचे नेते तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूर जिल्हा निरीक्षक बाळाभाऊ शेडगे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे यांनी भेट देऊन कोल्हापूरचे विभागीय सहाय्यक निबंध श्री काकडे साहेब आणि निवासी जिल्हाधिकारी संजय तेली साहेब यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागण्या योग्य असून त्यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोल्हापूर शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, विजय करजगार, राजू पाटील, अभिजित पाटील, यतीन होरने, सचिन पाटील, रोहन निर्मळ इत्यादी उपस्थित होते.