ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भव्य दिव्य सांगता

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरीत नुकताच ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचा भव्य पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला.या सोहळ्याची सांगता ज्ञानेश्वरी ग्रंथ हत्तीवर ठेवून मोठ्या उत्साहात दिंडी प्रदक्षणा व  ह.भ.प.प्रसाद महाराज बडवे यांचे काल्याचे किर्तनाने झाली.
           चारोधाम यात्रा संकल्प परिपुर्ती , गुरुवर्य वै.दत्तात्रय महाराज बडवे यांचे महानिर्वाण त्रितपपुर्ती, व गुरुवर्य ह.भ‌.प.श्री.प्रसाद महाराज बडवे यांचे सेवा त्रितपपुर्ती  या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन श्रीविठ्ठल मंदिर, नदिवेस मिरज येथील सर्व वारकरी भाविक भक्तांनी केले होते.
       सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री मा.ना.श्री.सुरेशभाऊ खाडे यांनी केले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, यांचेसह ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर ह.भ.प.शंकर महाराज बडवे, ह.भ.प.पांडुरंग कृष्णाजी बडवे महाराज, ह.भ.प.विजय पांडुरंग कुलकर्णी  उपस्थित होते. 
          ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प.उत्तम चंदर मगर मिरजकर यांनी केले तर.  सप्ताहात ह.भ.प.बाळासाहेब महाराज देहूकर, ह.भ.प.एकनाथ महाराज पिंपळनेरकर, ह.भ.प.हरिभाऊ महाराज बोराटे-आजरेकर ,ह.भ.प.केशव महाराज नामदास, ह.भ.प.चैतन्य महाराज वासकर, ह.भ.प.भागवत महाराज शिरवळकर या विद्वजनांची सुश्राव्य अशा किर्तनसेवा संपन्न झाल्या. सर्व कार्यक्रम वै.धोंडोपंत दादा संस्थान फड, येथे पार पडले. या सोहळ्याला फडावरील  वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.
       या सोहळ्यासाठी सर्वश्री.बाळकृष्ण येसुमाळी, महादेव भोसले, सोपान येसुमाळी, हरिसिंग रजपूत, शिवाजी भोसले, शशिकांत चौगुले,दिपक चंदगुडे रत्नाकर भोसले, शेषराज पाटील, विश्वास सावंत गणपती माने, सुलोचना सावंत, सुखदेव पवार, सर्जेराव पवार तसेच अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)