उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बालविवाह प्रथा निर्मूलनावर प्रबोधन
पंढरपूर दि. 18 (प्रतिनिधी) - सामाजिक परिस्थितीमुळे किंवा आर्थिक बिकट परिस्थितीमुळे होणारे बालविवाह थांबले पाहिजेत कारण मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास परिपूर्ण झालेला नसतो. बालविवाह प्रथा बंदीसाठी कायदा असला तरी समाजमन बदलण्याची ही आवश्यकता आहे असे प्रतिपादन मा. सौ मीराताई परिचारक यांनी केले.
उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी प्रबोधनात्मक कार्यक्रमात 'बाल विवाह प्रथा निर्मूलन' या विषयावर प्रमुख व्याख्यात्या म्हणून मा.सौ. मीराताई परिचारक या होत्या. तसेच लोकरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सुप्रसिद्ध भारुडकार मा. सौ चंदाताई तिवाडी यांनी आपल्या भारुड सादरीकरणातून 'बालविवाह प्रथा निर्मूलन' या विषयावर भारुडे सादर करून प्रबोधन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपसरपंच मा. सौ लता राजेंद्र हुंडेकरी या होत्या. या कार्यक्रमांमध्ये सरपंच मा.सौ दिपाली धनाजी बागल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ लोखंडे एन एस, प्रा.शिंदे एस. के, प्रा.कावरे व्ही एन, कारंडे एस एम, प्रा. खिलारे एस.डी, उपस्थित होते.तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी सर्वगोड एन सी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दाभोळकर व्ही एस यांनी केले. आभार प्रा.हजारे एस डी यांनी मानले.