पंढरपूर दि.06 (जिमाका) :- 6 जानेवारी हा मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन राज्यात सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर अधिनस्त उप माहिती कार्यालय पंढरपूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अमित निमकर तसेच माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी टीव्ही जर्नालिझम असोशिएसनचे अध्यक्ष अभिराज उबाळे, श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष सचिन कांबळे, श्रमिक पत्रकार संघ अध्यक्ष संतोष रणदिवे, पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामभाऊ सरवदे,पंढरपूर पत्रकार संघ अध्यक्ष अपराजित सर्वगोड, पत्रकार संरक्षण समिती शहराध्यक्ष यशवंत कुंभार, राज्य पत्रकार सुरक्षा समिती शहराध्यक्ष चैतन्य उत्पात, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार शहराध्यक्ष विनोद पोतदार, डिजिटल मीडिया शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, विरेंद्र उत्पात यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पहार अपर्ण करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रविण डफळ तसेच प्रकाश पाटील, किरण गाडेकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.