तहसिल कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

0
               पंढरपूर, दि.25 :-  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक २५ जानेवारी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. राज्यातील नागरीकांमध्ये मतदार नोंदणी तसेच मतदानाच्या महत्त्वासंदर्भात जागरुकता निर्माण व्हावी म्हणून या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, या अनुषंगाने १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस तहसिल कार्यालय पंढरपूर येथे साजरा करण्यात आला.
             सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी  गजानन गुरव व तहसिलदार तथा  सहा. मतदार नोंदणी अधिकारी  सुशिल बेल्हेकर  यावेळी कार्यक्रमास नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, निवडणूक नायब तहसिलदार वैभव बुचके, महसूल सहाय्यक राजेश शिंदे, तहसिलचे उमेश भोसले, कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय, स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, उमा महाविदयालय आणि विवेकवर्धिनी महाविदयालय या महाविदयालयांचे प्राध्यापक व  विदयार्थी उपस्थित होते.
      यावेळी उपस्थितीतांना  राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उत्कृष्ठ काम करणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, महाविदयालये यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांचबरोबर उपस्थितीतांना राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेतली. मतदार दिना निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही  रॅली तहसिल कार्यालय  येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
252 पंढरपूर विधानसभा मतदार संघात 13 हजार 595 मतदारांची वाढ
             252 पंढरपूर विधानसभा मतदार संघात दि. 6 जानेवारी 2023 ते 5 जानेवारी 2024 या कालावधीत एकूण 13 हजार 595 मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये  18 ते 19 वयातील 4 हजार 291 मतदार तर 20 ते 29 वयातील 6 हजार 778 मतदारांची नोंद झाली आहे. तसेच मयत, दुबार आणि कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या एकूण 15 हजार 450 मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. दुरुस्ती, स्थलांतर आणि ओखळपत्रासाठी प्राप्त झालेल्या एकूण 9 हजार 953 मतदारांची दुरुस्ती करण्यात आली आहे. 23 जानेवारी 2024 रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये 1 लाख 81 हजार 649 पुरुष मतदार  तर 1 लाख 69 हजार 819 स्त्री मतदार तसेच इतर 23 मतदार असून एकूण 3 लाख 51 हजार 491 मतदार आहेत.

              नवीन मतदान नोंदणी, स्थलांतरीत मतदार तसेच दुरुस्ती आणि नवीन ओळखपत्रासाठी अर्ज केलेल्या सुमारे 26 हजार नागरीकांना मतदान ओळखपत्र पोस्टाव्दारे वितरीत करणेत आले आहे. ज्या पात्र नागरीकांची,युवक-युवतींची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्यांचे भागासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे नमुना नंबर 6 चा अर्ज भरून दयावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी  गजानन गुरव व सहा. मतदार नोंदणी अधिकारी  सुशिल बेल्हेकर  यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)