पत्रकार हा समाजाबरोबरच लोकप्रतिनिधींचा आरसा असतो - आ. समाधानदादा आवताडे

0
पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : समाधानदादा आवताडे

          पंढरपूर (प्रतिनिधी) - पत्रकार हा समाजाबरोबरच लोकप्रतिनिधींचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना पत्रकार सातत्याने समोर आणतो. याचबरोबर लोकप्रतिनिधींचे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे काम सातत्याने करत असतो. या दरम्यान अनेक घटकांशी सामना पत्रकारांना करावा लागतो. मात्र पत्रकारांचे मूलभूत प्रश्न  कायम आहेत. 
            पंढरपूर येथील पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न सातत्याने मांडला जात आहे. काही दिवसातच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पत्रकारांना आमदार आवताडे यांनी दिला.
        आमदार समाधान आवताडे यांच्यावतीने पंढरपूर येथील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन येथील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख, माजी नगरसेवक सुनिल डोंबे, तुकाराम कुरे, विनोद लटके, समाधान घायाळ, प्रसाद कळसे उपस्थित होते.
        पुढे बोलताना आमदार समाधानदादा आवताडे म्हणाले की पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात पंढरपूरच्या विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. 
यातून दर्जेदार कामे कशी करता येतील याकडे लक्ष घालणार असल्याचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी पंढरपुरातील विविध विकास कामांंबाबत तसेच विठ्ठल मंदिराच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. यावर आमदार समाधानदादा आवताडे यांनी आपण यामध्ये लक्ष घालणार असल्याचा विश्वास दिला.
मंदिर समितीवर सदस्य म्हणून पत्रकार प्रतिनिधी घ्यावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.
सुरुवातीला आमदार आवताडे साहेब यांनी पत्रकार दिनाच्या व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर पत्रकारांचा सन्मान करून पेन, शाल आणि पंढरपूरचे पत्रकार श्रीकांत साबळे यांनी लिहिलेले संघर्षयात्री हे पुस्तक भेट दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)