सैनिक व परिवारास मोफत संगीत शिक्षण - कलापिनी संगीत विद्यालयाचा निर्णय

0
विकास पाटील यांची संकल्पना

          पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतासह जगभरात संगीत शिक्षण पोहचविणारया कलापिनी संगीत विद्यालय यांनी वेळोवेळी आदर्श समाजकार्य केले आहे. खूप मेठ्या प्रमाणात संगीत शिक्षंनाचा प्रचार व प्रसार केला आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून गेल्या ४४ वर्षापासून कलापिनी संगीत विद्यालय अंध,अपंग,निराधार यांना मोफत संगीत शिक्षण देत आहेत, पण देशासाठी कार्य करताना हुतात्मा झालेल्या  सैनिकांच्या परिवारासही मोफत संगीत शिक्षण देण्याचा विचार कलापिनी संगीत विद्यालय यांनी घेतला आहे.
        त्यासोबत भारत देशासाठी कार्यरत असलेल्या तसेच रिटायर झालेल्या सैनिकांच्या परिवारातील सदस्यांनाही आता कलापिनी संगीत विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया यावर ५० % फी माफ करण्याचाही निर्णय कलापिनी संगीत विद्यालयाने घेतला आहे. हि योजना 24 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विकास पाटील व कलापिनी संगीत विद्यालयचे संस्थापक पं.श्री. दादासाहेब पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  9307689653 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)