पंढरपुरात ‘सत्यशोधक‘ला उस्फुर्त प्रतिसाद

0
२००० पेक्षा अधिक नागरिकांनी पाहिला चित्रपट

अभिजीत पाटील यांच्यातर्फे दाखविण्यात आला एक दिवस मोफत चित्रपट

        पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरचा धगधगता इतिहास मांडणारा चित्रपट सुमारे २००० पेक्षा अधिक नागरिकांनी पाहिला. त्यांच्या कार्याचे दर्शन घेऊन त्यांचे पुरोगामी विचार पोहोचविण्याच्या हेतूने सत्यशोधक चित्रपट डीव्हीपी स्क्वेअर येथे पंढरपूरकरांसाठी एक दिवस मोफत दाखवण्यात आला.
        महापुरुषांचे कर्तृत्व आणि चरित्र दर्शन घेऊन बाहेर येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून गेले. या उपक्रमास महिलांचा मोठा सहभाग लाभला होता.
        पंढरपूरमध्ये प्रथमच महापुरुषांवर आधारित चित्रपट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा या हेतूने चित्रपटगृह एक दिवस मोफत खुले केले गेले. चांगल्या उपक्रमांना पंढरपूरमध्ये आणण्यासाठी चेअरमन अभिजीत पाटील प्रसिद्ध आहेतच. चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी चित्रपट मोफत दाखविणे हे पंढरपूरवासियांसाठी चर्चेचा विषय ठरला. 

         वैचारिक भूमिकांना प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)