तुळशी वृंदावन उद्यानातील माहितीसाठी क्यु आर कोड - वनपरिक्षेत्र अधिकारी चैताली वाघ

0
वनविभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम 

          पंढरपूर :- (दि.09)-  तुळशी वृंदावन उद्यान भाविकांसह स्थानिक नागरिक, पर्यटकांसाठी  दि.8 जानेवारी 2024 पासून खुले करण्यात आले असून. तुळशी वृंदावन उद्यानातील  भित्ती चित्र, संत मुर्ती आणि इतर सर्व गोष्टींची माहिती  पर्यटकांना सहजतेने वाचता व  ऐकता येणार आहे. यासाठी वन विभागामार्फत प्रत्येक भित्ती चित्राजवळ क्यु आर कोड लावण्यात आले असल्याची माहिती वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी दिली.

           ऑनलाईन पद्धतीने tulashi.solapurturisum.in या वेबसाईटचा वापर करून सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते तसेच मोबाईल मधुन क्यु आर कोड  स्कॅन करून देखील माहिती वाचता व ऐकता येईल. सद्यस्थितीत सर्व माहिती ही मराठी भाषेमध्ये उपलब्ध असुन लवकरच इंग्रजी भाषेमध्येही उपलब्ध करण्यात येणार आहे. सदरचा उपक्रम उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे.
         या वेबसाईटवरील माहिती ही विविध तज्ञ व्यक्तींकडून तपासून घेतलेली आहे. तरी सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास तसेच अधिक माहितीबाबत काही सुचना असल्यास rfopandharpur@gmail.com या ईमेल वर भाविकांनी, नागरिकांनी तसेच पर्यटकांनी संपर्क साधावा असे आवाहन  वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)