पंढरपुरात नाट्य संमेलनाच्या निमित्ताने कलाकारांची बैठक

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने स्थानिक कलाकारांची बैठक रखुमाई सभागृहात आयोजित करण्यात आली होती. 100 व्या नाट्य संम्मेलनाच्या निमित्ताने पंढरपुरात दिं. 20 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान पंढरपुरातील रसिकांना मिळणार विविध कार्यक्रमाची मेजवानी दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी पंढरपुरातील स्थनिक कलाकार या संमेलनाच्या निमित्ताने आपला कलाविष्कार दाखविणार असून पंढरपुरातील जुन्या आणि नव्या पिढीतील नाटय कलाकार, शाहिरी कलाकार, लोक कलाकार, गायक कलाकार, नृत्य कलाकार, भारुड कलाकार, लावणी, भजन, कीर्तन पथनाट्य अश्या विविध कलाकारांचे सादरीकरण या 100 व्या नाट्य संम्मेलनाच्या निमित्ताने होणार आहे. 
        येथील पोलीस संकुल रखुमाई सभागृह या ठिकाणी कलाकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जेष्ठ कलाकार  नटसम्राट विनय महाराज बडवे, रेडिओ स्टार दिलीप टोमके, भारुडकार चंदाताई तिवारी, संध्या साखी, डॉ. प्राजक्ता बेणारे, शिवराज सरणाईक,  विजय व्यवहारे, नाटय कलाकार शाम सावजी, संतोष शिरगिरे, रविंद्र शेवडे, दिलीप सुरवसे,
अजित व्यवहारे, कालिदास सोनवणे, आशिष शहा नाटय परिषदेचे अध्यक्ष डॉ.  मंदार  सोनवणे,  उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप , सहकार्य वाहक राजाभाऊ उराडे, कोषाध्यक्ष  विक्रम बिस्किटे सर आदिजन उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)