पंढरपूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे व इंदिरानगर जिल्हा परिषद शाळा चंद्रभागा शेड येथे कडेगाव पलुसचे लोकप्रिय आमदार विश्वजीत दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आंबे गावचे मा. डेप्युटी सरपंच विठ्ठल शिंदे, आंबे गावचे डेप्युटी सरपंच निशाल शिंदे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन भैय्या वाघाटे, ग्रामपंचायत सदस्य अरुण भाऊ शिंदे, अशोक अण्णा शिंदे, श्रीरंग दादा कोळी, संभाजी अण्णा शिंदे, गणेश कांबळे, हरीश शिंदे, प्रकाश तात्या शिंदे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष माऊली कोळी, धाडस सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन शिरगुर, मंगेश कोळी, बाळासाहेब शिंदे, महेश कोळी, आनिल चौधरी आदी मान्यवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.