किर्तन सोहळा व कुस्ती स्पर्धा
भाळवणी ता. पंढरपूर (प्रतिनिधी) - कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व. वसंतराव (दादा) काळे यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि ८० व्या जयंतीनिमित्त् सालाबादप्रमाणे कारखाना कार्यस्थळावरील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये दि. ०२/०२/२०२४ ते दि.०८/०२/२०२४ या कालावधीत सायं.८.०० ते १०.०० या वेळेत सुप्रसिध्द् किर्तनकारांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असून, सदर सोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार दि. ०२/०२/२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता श्रीविठ्ठल-रुक्मिणीची महापुजा व कलश पुजनाने होणार आहे.
दि.०९/०२/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सुप्रसिध्द् किर्तनकार ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, पंढरपूर यांचे काल्याचे किर्तनाने सदर सोहळ्याची समाप्ती होणार असून, तदनंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
तसेच दि.०९/०२/२०२४ रोजी दु.१२.०० वा. वसंतदादा मेडिकल फौंऊडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, पंढरपूर यांचेवतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, दुपारी ३.०० नंतर वसंत केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन कल्याणराव वसंतराव काळे यांनी केले आहे.