"झाडे लावा, झाडे जगवा" हा कृषीकन्यांनी दिला सामाजिक संदेश
वाडीकुरोली ता. पंढरपूर (प्रतिनिधी) - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी अंतर्गत रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज येथील कृषीकन्या तृप्ती आदमिले, प्रिती हांडे, गौरी कदम, श्रद्धा गायकवाड,, अपेक्षा जाधव, निकिता ढगे, प्रियंका जायभाय, सेजल महाजन, प्राची जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर.जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस .एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम चंदनकर, प्रा. एच. व्ही. कल्याणी तसेच प्रा. एस. एल. मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी चिकू, आंबा अश्या विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सौ. लाडाबाई काळे सरपंच वाडीकुरोली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान (दादा) काळे, प्राचार्य खरात सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमात कृषि कन्यांनी वृक्षारोपणाची गरज व फायदे, वृक्ष संवर्धन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले तसेच वृक्षारोपण करून निसर्गाचे संतुलन कसे करता येईल व वृक्ष संवर्धन केल्याने पर्यावरणाची होणारी हानी कशी टाळता येईल याबद्दल माहिती देण्यात आली.
झाडे लावा, झाडे जगवा हा सामाजिक संदेश गावकऱ्यांना देण्यात आला.