स्व.भीमराव महाडिक यांच्या स्मरणार्थ व खा.धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचेआयोजन
मोहोळ (प्रतिनिधी) - भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक/चेअरमन स्व. भीमराव दादा महाडिक यांच्या स्मरणार्थ व भीमा सह साखर कारखान्यांचे मा.चेअरमन संसदरत्न खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सह. साखर कारखान्यांचे युवा चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या संकल्पनेतून रविवार दि.७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वा.भीमा सह साखर कारखाना लि,टाकळी-सिंकदर ता.मोहोळ येथे भव्य निकाली कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील मातब्बर पैलवानांची उपस्थिती राहणार आहे. या कुस्त्या आखाड्यात जवळपास १५ लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान भीमा कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. भिमा केसरीसाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख×प्रदीपसिंग जीरगपूर,भीमा कामगार केसरी या किताबसाठी पै. प्रकाश बनकर ×पै. विशाल भुंदू,भीमा सभासद केसरी माऊली कोकाटे ×गुरजीत मारगोड,भीमा साखर केसरी या किताबसाठी महेंद्र गायकवाड×दिनेश गोलिया या भीमा केसरी भव्य निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या लक्षवेधी लढतीकडे भीमा पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागले आहे.
तरी या भीमा केसरी भव्य कुस्ती स्पर्धेसाठी वस्ताद म्हणून पै. दीनानाथ सिंग (हिंद केसरी), पै. राम सारंग (राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते ), पै. अफसर शेख (ऑल इंडिया चॅम्पियन), पै.रावसाहेब मगर, पै. छोटा रावसाहेब मगर (महाराष्ट्र केसरी), पै. मुन्नालाल शेख (महाराष्ट्र केसरी), गोरख निर्मळ,पै.समाधान घोडके (महाराष्ट्र केसरी), पै. मौला शेख (उप - महाराष्ट्र केसरी), पै. योगेश बोंबाळे (महान भारत केसरी), पै.भरत मेकाले (उप - महाराष्ट्र केसरी), पै.अन्सार शेख (महाराष्ट्र चॅम्पियन), पै. सर्जेराव चवरे ( सोलापूर जिल्हा तालीम उपाध्यक्ष), पै.कुस्तीसम्राट अस्लम काझी, पै. भिवा शेंडगे, लक्ष्मण पांढरे,सत्यवान घोडके,पै. आसिफ शेख (सोलापूर केसरी), पै.महादेव चव्हाण सुस्ते, पै.सत्यवान घोडके,पै.समाधान लोमटे, पै.जमीर मुलाणी, महेंद्र देवकते, संजय बाबर,मोहन गावडे,पै.विलास तिरवे, पै.आण्णा शेंडगे, पै. आबादेव पुजारी, पै.चंद्रकांत काळे, पै. मारूती माळी, पै. महेंद्र देवकते, पै. भिमराव मुळे, पै. गणेश वाघमोडे, पै. सिद्राम मदने, पै. संजय बाबर, पै. सुधाकर गायकवाड, पै. महादेव येळे हे प्रमुख वस्ताद उपस्थित राहणार आहेत तर कुस्तीसाठी संपर्क करायचा असेल तर पै. शरीफ शेख ९९२१७४५५७७/८०८०९०१०३१ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन भीमा परिवाराकडून करण्यात आलेले आहे.या भव्य दिव्य निकाली कुस्त्यासाठी निवेदक म्हणून धनाजी मदने,अशोक धोञे हे कुस्ती स्पर्धेचे समालोचन करणार आहेत.