ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

0


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

        मुंबई (वृत्तसंस्था) - ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदनही केलं आहे.

          अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.


       मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)