उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अनुलोमच्या वस्ती मित्रांना श्रीरामाची कोदंडधारी मूर्ती

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनुलोमच्या वस्ती मित्रांना प्रभू श्रीराम यांची कोदंडधारी मूर्ती प्रदान केली आहे, ती मूर्ती स्वीकारताना श्रीविठ्ठल मंदिर परिसरातील वस्ती मित्र बाळकृष्ण गोविंद डिंगरे यांनी पंढरपूर-मंगळवेढा भाग जनसेवक रामेश्वरवसंत कोरे पंढरपूर यांचे कडून स्वीकारली.
       यावेळी राष्ट्रीय वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते ह. भ. प. रामकृष्ण वीर महाराज, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सचिन लादे सर, हिंदू महासभेचे प्रांतिक नेते अभयराजे इंचगावकर, सोलापूर तरुण भारतचे पत्रकार महेश खिस्ते, भाजप चे नेते आशुतोष देशपांडे इत्यादी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)