नेहमीच वादग्रस्त विधान करणारे जितेंद्र आव्हाडांनी हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांचे बद्दल जे पुरावे देऊन वादग्रस्त विधान केले ते सर्वस्वी निंदनीय आहे. वाल्मिकी रामायणातील श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून हिंदुद्वेषी जितेंद्र आव्हाडानी समस्त हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाज आळंदी यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात बरेच ठिकाणी या वादग्रस्त विधानावर हिंदू समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची सर्वत्र मागणी होत आहे