शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवांग कोष्टी समाजाच्यावतीने श्रीचौंडेश्र्वरी उत्सव आनंदात साजरा

0
            पंढरपूर (प्रतिनिधी) - पौष अष्टमी पासून ते पौष पौर्णिमेपर्यंत सर्वत्र शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. पंढरपूर शहरातदेखील समस्त देवांग कोष्टी समाजाच्यावतीने श्री चौंडेश्वरी मंदिरात आज पौष पौर्णिमा म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा हा दिवस श्रीचौंडेश्वरी मातेच्या उत्सवाने मोठ्या आनंदात पार पडला.
        या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अनिल रोकडे सर होते. या कार्यक्रमास ट्रस्टचे उपाध्यक्ष भीमराव रेपाळ, सदस्य सतीश इदाते व श्रीमती शुभांगी कांबळे हे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव व भाविक उपस्थित होते.
         प्रास्ताविकात सचिव सुभाष लोटके यांनी चौंडेश्वरी उत्सवाचे धार्मिक स्वरूप सांगितले. आज या कार्यक्रमात चौंडेश्वरी उत्सवाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आले.
          यात आदर्श अभियंता बांधकाम विभाग पुरस्कार प्राप्त श्री.अतुल लोटके,आदर्श अभियंता महावितरण राज्यात द्वितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त श्री.मकरंद लोटके,आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ.वासंती रेपाळ, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.प्रदीप कवडे तसेच NIMA या वैद्यकीय संघटनेच्या श्रीधन्वंतरी  पॅनल चे नवनियुक्त पदाधिकारी डॉ.किशोर बागडे व डॉ.आकाश रेपाळ यांचा समाजाच्या वतीने देवीची प्रतिमा, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
           यावेळी मनोगत व्यक्त करताना श्जीवन रेपाळ यांनी समाज संघटन, संस्कृती व जिव्हाळा जपावा असे आवाहन केले. तसेच समाजातील गरजवंतासाठी व मार्गदर्शनासाठी नेहमी सहकार्य केले जाईल असे आश्वासन उद्योजक श्री.सतीश इदाते यांनी दिले.
   अध्यक्षीय भाषणात प्रा.अनिल रोकडे यांनी समाजाचे मंदिर कामातील कै.ह.भ.प.सुदाम नेकनुरकर महाराजांचे योगदान कथन केले.मंदिर सजावटीसाठी श्री.महेश करपे व श्री.गणेश दिवटे यांनी परिश्रम घेतले.
           यावेळी महिलांचा हळदी कुंकू समारंभ तसेच होम मिनिस्टर व संगीत खुर्ची स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.याचे नियोजन सौ.विद्या रेपाळ, सौ.मंजुषा तारळेकर, सौ.संध्या  रोकडे, सौ.मधुरा कांबळे, डॉ.दिपाली रेपाळ, सौ.मनीषा पंधे आदी महीलानी योगदान दिले. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन प्रा.धनंजय पंधे यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)