हा कार्यक्रम संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. आमदार प्रशांतरावजी परिचारक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पालवी येथील विशेष बालकांचा प्रकल्पांच्या मंगलाताई शहा व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना प्राध्यापक प्रवीण दवणे यांचे शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक अनंत कुलकर्णी यांनी केला. मा. प्रा. डॉ. मिलिंद परिचारक (कार्यवाह) यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव राजगोपाल भट्टड, विश्वस्त प्रणव परिचारक व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संभाजीराव शेळके यांनी केला.