उमा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

0
          पंढरपूर दि. १७ (प्रतिनिधी) - येथील उमा महाविद्यालयाच्या वतीने गादेगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दि. १७ ते २३ जानेवारी अखेर संपन्न होत आहे.
         "राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाजाप्रती सेवाभाव रुजला जातो. तो सामाजिक बांधिलकी जोपासणारा आणि व्यक्ती विकासास पूरक असून समाज विकसित करणार असतो"असे प्रतिपादन श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संस्थेचे विश्वस्त युवा नेते प्रणवजी परिचारक यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.
        या श्रमसंस्कार शिबिरासाठी उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव राजगोपालजी भट्टड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धीरजकुमार बाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे जीवनातील महत्त्व विशद करताना. कॉलेज मधील विद्यार्थी जीवनात व्यक्तिमत्व विकास या शिबिराच्या माध्यमातून होतो तो समाज विधायक अशा स्वरूपाचा असतो असे प्रतिपादन केले. माजी उपसरपंच गणपत मोरे यांनी  मनोगत व्यक्त केले.
        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मा.सौ.दिपाली धनाजी बागल या होत्या. त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी उपसरपंच मा. सौ लता राजेंद्र हुंडेकरी, माजी  उपसभापती विष्णू भाऊ बागल, कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर माजी सभापती  विष्णू रेडे, सोसायटी चेअरमन शशिकांत बागल, ग्रामसेवक जयंत खंडागळे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.लोखंडे एन एस, , प्रा. शिंदे एस के, प्रा.कारंडे एस एम, प्रा.खिलारे एस डी, प्रा.दाभोळकर व्ही एस, प्रा. कोल्हापुरे आर.ए, प्रा.कुंभारकर आर. ए. तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामपंचायत सदस्य व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सर्वगोड एन. सी. यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कावरे व्ही. ए. यांनी केले प्रा. हजारे एस डी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)