दानशूर भाविकांकडून चांदीची वस्तू अर्पण
पंढरपूर ता.३१ (प्रतिनिधी) - वारकरी भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी असंख्य भाविकभक्त आपापल्या परीने दान करीत असतात. आज पुणे येथील सौ. माया सतीश देशमुख या दानशूर भाविकांने श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी चांदीची (चंद्र व सूर्य) वस्तू अर्पण केली.
त्याचे वजन 3 किलो 110 ग्रॅम असून, रक्कम रुपये 2,82,000 इतके मूल्यांकन होत आहे.
सदर भाविकांचा यथोचित सन्मान मंदिरे समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला. त्यावेळी विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.