पंढरपूर (प्रतिनिधी) - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.झुंजार आसबे साहेब यांच्या आदेशानुसार कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे नेते मा.श्री. कल्याणराव काळेसाहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रांतिक सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कारखान्याचे खातेप्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या वतीने कारखान्याचे जनरल मॅनेजर (टेक्निकल) श्री.पी.डी.घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री.नवनाथ माने जिल्हा उपाध्यक्ष, श्री अनिल नागटिळक तालुकाध्यक्ष, श्री.सुनील पाटील तालुका कार्याध्यक्ष, श्री.अर्जून जाधव जिल्हा कार्यकारिणी सदस्य, श्री.नारायण शिंदे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,श्री.शकुर बागवान शहरकार्याध्यक्ष या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.श्री.कल्याणराव काळे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रांतिक सदस्य पदी निवड झालेबद्दल पिराची कुरोली गावच्या वतीने श्री.पांडुरंग कौलगे, श्री.रामभाऊ कौलगे, श्री.समाधान कौलगे ,श्री.नवनाथ कौलगे यांनी सत्कार केला.
या वेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री भारत नाना कोळेकर, संचालक श्री.मोहन नागटिळक संचालक श्री.परमेश्वर लामकाने, संचालक श्री.सुरेश देठे माजी संचालक, श्री.पांडुरंग कौलगे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन श्री.शहाजी साळुंखे, श्री.रामभाऊ कौलगे, डेप्युटी जनरल मॅनेजर के.आर.कदम, वर्क्स मॅनेजर जी.डी.घाडगे, चीफ अकाउटंट श्री.बबन सोनवले, चीफ केमिस्ट श्री.विजय सावंत, फायनान्स मॅनेजर श्री.रवींद्र घुले, मॅनेजर,को-जन मॅनेजर श्री.डुबल, प्रॉडक्शन मॅनेजर श्री.तांबारे, मुख्य शेती अधिकारी श्री.अशोक गुळमकर, श्री.चौगुले उपशेती अधिकारी श्री.पी.आर.थोरात, डेप्युटी चीफ अकाउंटंट श्री.नवनाथ कोलगे, केन सप्लायर ऑफिसर श्री.हरिभाऊ गिड्डे, परचेस ऑफिसर श्री.चंद्रकांत कुंभार, सिव्हिल इंजिनिअर श्री. नानासाहेब काळे, केनयार्ड सुपरवायझर श्री.दिलीप काळे, स्टोअर कीपर श्री.जावेद मुजावर, सुरक्षा अधिकारी श्री.मनसुब सय्यद,बंडु पवार व उपखाते प्रमुख , कर्मचारी उपस्थित होते.