आपटे उपलप प्रशालेचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी) - आयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर बांधलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (दि. २२) होणार आहे. यानिमित्त शनिवारी सकाळी प्रार्थनेच्या वेळी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक दत्तात्रेय धारूरकर व पर्यवेक्षक अनिल अभंगराव यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक अनिल अभंगराव यांनी विद्यार्थ्यांना आयोध्या रामजन्मभूमीचा इतिहास सविस्तर सांगितला. कार्यक्रमास श्रीराम उत्सव समितीचे पदाधिकारी आनंद नगरकर, बाळासाहेब डिंगरे उपस्थित होते.
प्रशालेतील कु रिद्धी हरिदास, सिद्धी हरिदास यांनी रामरक्षा पठण केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रुपाली कुलकर्णी यांनी केले, कार्यक्रमास प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक बंडोपंत गुलाखे, नरेंद्र डांगे, संतोष करकमकर,आनंद सवाई, सौ अनिता सर्वगोड आदी सर्व शिक्षिक सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.