चैतन्य विद्यालय व सु गो दंडवते क. महाविद्यायात राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती विविध उपक्रमांनी साजरी
नीरा नरसिंहपूर (प्रतिनिधी) - येथील चैतन्य विद्यालय व श्री. सु. गो. दंडवते कनाष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती "युवक दिन" म्हणून व राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध उपक्रमाने म्हणजे मराठी,..इंग्रजी,..हिंदी,.. विषयांच्या वक्तृत्व,..निबंध,..स्पर्धा व..राजमाता जिजाऊ याच्या वेशभुषेत "मी राजमाता जिजाऊ बोलतेय" विद्यार्थ्यींनी सहभाग घेऊन मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शि. प्र. मंडळाचे कार्यवाह श्री. श्रीकांत दंडवते होते. तसेच शि. प्र मंडळाचे खजिनदार श्री.मगनदास क्षीरसागर उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री. गोरख लोखंडे सर यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल माहिती सांगून मार्गदर्शन केले.कार्यक्रामाचे अध्यक्ष श्रीयुत श्रीकांत दंडवते यांनी स्वामी विवेकानंद व छ.शिवाजी महाराज यांना आदर्श व संस्कारक्षम राजा बनण्यासाठीचा उपदेश शिकवण कशी दिली यांची माहीती दिली व सांस्कृतिक विभागास धन्यवाद दिले व सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे कौतुक केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. लावंड सर यांनी उत्तम सुत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. तसेच मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींनी व सर्व शिक्षकांनी मुख्यमंत्री संदेश पत्राचे वाचन केले.