दुर्गा शिशु विहार व प्राथमिक शाळेमध्ये "बाजार डे" साजरा

0
              पंढरपूर (प्रतिनिधी) - इसबावी येथील दुर्गा शिशु विहार व प्राथमिक शाळेमध्ये बाजार डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे उद्घाट समाधान मलपे (शाखा अधिकारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह बॅंक मर्या भंडीशेगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. 
ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या, ताज्या फळभाज्या, विविध हिवाळी भाज्या, वाणसामान तसेच चविष्ट व रुचकर खाद्यपदार्थ तसेच इतर विविध गोष्टी विक्रीसाठी आणल्या होत्या. बाजार डे मध्ये खरेदी करण्यासाठी शाळेतील शिक्षक तसेच इसबावी परिसरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. 

        बाजार डे घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना गणितीय ज्ञान समजणे, बाजार भाव समजावणे, चलनातील नानेवारी समजणे, त्यांच्या बुद्धीला आकडेवारीची चालना देणे हा मुख्य उद्देश होता.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ.संतोष जोशी यांनी दिली.
        या बाजाराला उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांचे अभिनंदन मुख्याध्यापिका सौ. हेमलता डांगे मॅडम यांनी केले. ह्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ.संतोष जोशी खजिनदार श्री ज्ञानेश्वर मलपे सर मुख्याध्यापिका सौ.हेमलता डांगे मॅडम व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)