पंढरपूर, दि.31 :- ऊसतोड कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी व त्यांची फसवणुक, पिळवणुक होऊ नये यासाठी. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ऊसतोड कामगार वस्तीमध्ये दिवाणी न्यायाधीश एम. आर. कामत अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
ऊसतोड मुकादम यांनी जर पिळवणुक केली तर त्यासाठी कायद्याची मदत घ्यावी, ऊसतोड कामगार हे असंघटीत कामगार असल्याने त्यांना शासनाच्या विविध योजना लागू होतात व त्यांनी त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. असे न्यायाधीश कामत यांनी ऊसतोड कामगारांना कायद्याची सांगितले.
सदर शिबीरास पंढरपूर अधिवत्का संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी प्रस्तावना, कामगारांना हक्कांची माहिती सचिव ॲड. राहुल बोडके व कार्यक्रमाचे आभार शशिकांत घाडगे यांनी मानले.
कार्यक्रमास ऊसतोड वस्तीवरील कामगारासह महिलांचा मोठा सहभाग होता, त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी के के शेख, व्ही. डी. ढोबळे, डी. एम. भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.