पंढरपूर (प्रतिनिधी) - दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, निशिगंधा सहकारी बँक व रुक्मिणी सहकारी बँक यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सायबर सुरक्षा संदर्भातील प्रशिक्षणावेळी या विषयातील तज्ञ हेमंत देशमुख यांनी "संगणक व इंटरनेट द्वारे होणारे बँकांवरील हल्ले" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
चोरी, दरोडा यासाठी पारंपारिक पद्धती न वापरता सध्या सुशिक्षित दरोडेखोर बँकांच्या प्रणालीवर सायबर हल्ला करून खातेदारांच्या खात्यातील पैसे काढून घेत आहेत.या संदर्भात सर्व बँकांनी दक्ष राहून रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे त्यांनी आवर्जून सांगितले
मर्चंट बँकेच्या सभागृह झालेल्या सदर प्रशिक्षणास मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे, निशिगंधा बँकेचे चेअरमन आर बी जाधव तसेच रुक्मिणी बँकेचे व्हाईस चेअरमन श्री चव्हाण सर यांच्याबरोबरच बँकांचे संचालक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मर्चंट बँकेचे सीईओ अतुल म्हमाणे, निशिगंधा बँकेचे सीईओ कैलास शिर्के, रुक्मिणी बँकेचे सीईओ बाळासाहेब चौगुले आदींनी परिश्रम घेतले.