पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - पत्रकार दिनाचे औचित्य साधून पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात प्रथमच पोलीसांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
      पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे  पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक पत्रकारांचा पुष्पगुच्छ, पेन व डायरी देवून पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
         यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. तय्यब मुजावर, पोलीस निरीक्षक श्री. ओलेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. देवकर, गोपनीय शाखेचे श्री. गजानन माळी  आदींसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल पत्रकार भगवान वानखेडे, सचिन कांबळे, राजकुमार घाडगे यांनी पोलीस निरीक्षक मुजावर यांचेसह सर्व तालुका पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)