निबंध स्पर्धेत आपटे उपलप प्रशालेच्या कु. सानिका प्रकाश जबडेला द्वितीय क्रमांक

0
फुले- शाहु- आंबेडकर विचारमंच आयोजित निबंध स्पर्धेत आपटे उपलप प्रशालेच्या कु सानिका प्रकाश जबडेला द्वितीय क्रमांक प्राप्त !

            पंढरपूर (प्रतिनिधी) - २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपूर आयोजित पंढरपूर तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत आपटे उपलप प्रशालेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु सानिका प्रकाश जबडे या विद्यार्थिनीच्या ''क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जीवनकार्य'' निबंधास द्वितीय क्रमांकाचे रुपये १५०० चे बक्षिस मिळाले. स्पर्धेत तालुक्यातील २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
          प्रशालेत तीचा सत्कार पर्यवेक्षक अनिल अभंगराव यांनी केला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका कु. विजया टेके, आबासो खरात, बंडोपंत गुलाखे, जगदिश डांगे, गणेश गंगेकर, आनंद सवाई आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)