महावीर फाउंडेशन पंढरपूरचा समाजोपयोगी उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी) – महावीर फाउंडेशन पंढरपूर च्या वतीने पंढरपूरकरांसाठी एक नविन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. पंढरपूरात प्रथमच शीत शव पेटी (Dead Body Freezer Box) आणि रुग्ण सेवा साहित्य उपलब्ध करण्यात येत आहे .
ही सेवा रविवार दि १४ जानेवारी २०२४ पासुन स्व.सागर राजेंद्र दोशी यांचे स्मृती प्रित्यार्थ सुरुवात करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती अमोल अरुण मोदी, सुयोग प्रविण शहा, मनोज विजयकुमार दोशी, धिरज रमनलाल दोशी,श्रीकांत महावीर खडके, समीर सुरेंद्र दोशी,राजेश शांतीलाल शहा, सोनीक देशभुषण कोठारी,निश्चल विपिनचंद्र शहा, सुदेश विजय व्होरा,संतोष जिवराज शहा,
प्रमोद जिवंधर शहा,राजेंद्र कस्तुरचंद दोशी महावीर फाउडेशन पंढरपूरच्यावतीने करण्यात आले आहे.
दि.१४ जानेवरी २०२४ सायंकाळी ५ ते ८ यावेळी महालक्ष्मी फर्निचर लिंक रोड, पंढरपूर येथे हा कार्यक्रम होणार आहे