कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे बक्षीस वितरण
पंढरपूर (प्रतिनिधी) - "कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याने महात्मा गांधी प्रभावित झाले होते. साबरमतीच्या आश्रमात मला जे करावयाचे होते ते आपण यशस्वीरित्या करुन दाखवले असे म्हणत. गांधीजींनी अण्णांना आशीर्वाद दिले." असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुलकर्णी यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात 'गांधी विचार संस्कार परीक्षे'च्या पंढरपूर जिल्हास्तरीय पारितोषिक वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. चंद्रकांत खिलारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मंचावर पर्यवेक्षक प्रा. युवराज औताडे, मुख्याध्यापक आर. बी. केदार व संयोजक डाॅ. डी. एम. चौधरी उपस्थित होते.
गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले कि, "महात्मा गांधींनी हरीजन फंडातून रयत शिक्षण संस्थेला दरवर्षी काही रक्कम मदत म्हणून दिली. कमवा आणि शिका सारखी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारी योजना ही अण्णांची मोठी देणगी असून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा आयुष्यभरासाठी लाभ झाला. गांधीजींच्या विचारांचेच अण्णा पाईक होते."
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेस माल्यार्पणाने झाली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डाॅ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, "गांधी विचार संस्कार परीक्षा पिढ्या घडविण्याचे कार्य करीत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गांधीप्रतिची कृतज्ञता व त्यांच्या नावाचे चिरकाल स्मरण व्हावे यासाठी आपल्या अनेक शाळा, महाविद्यालयांना त्यांचे नाव दिले आहे." यावेळी पालक नितीन गंगथडे यांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजक प्रा. डॉ. डी. एम. चौधरी यांनी सूत्रसंचालन तर डाॅ. शिवाजी तांदळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी ओंकार नेहतराव, अमोल माने व सहकाऱ्यांनी मदत केली.
गांधी विचार संस्कार परीक्षा सोलापूर जिल्हा – निकाल
प्रथम क्रमांक - सिमरन खंडागळे (मांजरी), संस्कार पाटील (अंकोली), वेदांत पवार (मांजरी), प्रतीक्षा नाडगे (अकोला), ओवी वाघमारे (मांजरी), उत्कर्षा धायगुडे (भोसे), श्रावणी जाधव (भाळवणी), ऋतुजा शिंदे, सानिका गोरे (उपळाई बु.), आदिती खराडे ( काटेगाव), श्रेया भिंगारे, साजिद शिकलकर, वेदांती पवार (भोसे), महेक मुजावर (अंकोली), सुनयना गणपा (सोलापूर), प्रतीक्षा पासले (भाळवणी), करीना पवार (सोलापूर), मनस्वी गादेकर (बार्शी), मयुरी गोरे (भोसे) श्रेया खटकाळे (अकोला), प्रतिभा जाधव (बार्शी), हिना अन्सारी (सोलापूर), सायली पवार, देवकी कांबळे (पंढरपूर), साहिल कांबळे (अक्कलकोट), सार्थक लामकाने (पंढरपूर)
द्वितीय क्रमांक - गव्हाणे अंताक्षरी (अकोला), सावंत शुभम (कर्देहल्ली), वाघमारे आदिनाथ (देगाव), साळुंके ओम (कर्देहल्ली), निकहत बागवान, वैभवी कोरे , निंबाळकर साक्षी (सोलापूर), नागणे शुभम, चव्हाण अस्मिता, गावडे सिद्धी , खुळे जयश्री, शेळके पायल (भोसे), गायकवाड प्राजक्ता (अकोला), दीक्षिता मादास (सोलापूर), माने विशाल (पंढरपूर), मस्के साक्षी (बार्शी), माने चौगुले श्रीराम शिवाजी, पवार प्रियंका (पंढरपूर)
तृतीय क्रमांक - गंगथडे स्वरांजली (गादेगाव), सुजित अतुल (रिधोरे), ज्योती शिंदे (मरवडे), ओंकार मुळे (वडाची वाडी), काळे प्रिती (वडवळ), यश जावळे (सोलापूर), शेवाळे कृष्णप्रिया (पंढरपूर) मेहक शहापुरे (सोलापूर), बंडगर साक्षी (पुळूज), डोळसे अनुष्का (सोलापूर), ऐश्वर्या शरद (सोलापूर), आफताब सय्यद (चिखलठाण), प्रिती गायकवाड (वांगी न.१), माळी ऋषिकेश (रोपळे बु.), सृष्टी गवळी (मरवडे), केंगार श्रावणी (कुसूर) गिराम अनुष्का, गुंड अनुष्का (उपळाई बु.), दडस वैष्णवी (पिलीव), घालमे प्रिती (महुद बु.), दिव्या भूसनर (बोरगाव), माळवदे प्रिती (भाळवणी), पायल पिसे (बोरगाव), स्नेहल बेल्ले (अक्कलकोट), माने धनश्री (पंढरपूर), सुवर्णा परकीपंडला (सोलापूर)